24 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील कामे वेळेत पूर्ण होतील. दिवस हसत-खेळत घालवाल. सर्वांशी मनमिळाऊपणे वागाल. कामात प्रगतीला चांगला वाव मिळेल.
 • वृषभ:-
  जोडीदाराकडून मिळणारे सौख्य वाढीस लागेल. दूरच्या प्रवासाचा योग्य येईल. भावंडे कामानिमित्त दूर गावी जातील. नसत्या काळज्या करत बसू नये. निर्णयात घाई करू नका.
 • मिथुन:-
  स्वकष्टावर अधिक लक्ष द्यावे. मनातील इच्छा जागृत ठेवाल. आर्थिक बाजू बळकट कराल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. मित्रांच्या संगतीत दिवस मजेत जाईल.
 • कर्क:-
  धंद्यात मनाचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक दर्जा सुधारेल. व्यापारीवर्ग खुश राहील. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कामाची गती वाढेल.
 • सिंह:-
  तुमची ठाम बाजू सर्वांच्या लक्षात येईल. काही निर्णय धाडसाने घ्याल. बोलतांना भडक शब्द वापरू नका. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. जेवणाच्या वेळा चुकवू नका.
 • कन्या:-
  काही गोष्टी सुरळीत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. मन एकाग्र करावे. स्वतः चाच गोंधळ उडवून घेऊ नये. केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. काही कामे तुमचा वेळ वाया घालवू शकतात.
 • तूळ:-
  प्रेमसौख्यात भर पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अंगिभूत कलेला जोपासावे. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. नैराश्य बाजूला सारावे.
 • वृश्चिक:-
  घरी मोठ्या लोकांची उठबस होईल. मित्रांशी होणारे गैरसमज दूर करावेत. जुनी कामे रेंगाळत ठेवू नयेत. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. उगाच शंका काढत बसू नका.
 • धनु:-
  मुलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वतः च्याच मतावर अडून राहू नये. एककल्ली विचार न केलेलेच बरे. बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. नवीन मित्र जोडले जातील.
 • मकर:-
  कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. चिरचिरेपणा सोडून द्यावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नयेत. कामात प्रगती करता येईल. वडीलधाऱ्यांची नाराजी दूर करावी.
 • कुंभ:-
  किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्यावे. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. भावंडाना आर्थिक मदत करावी लागेल. पत्नीशी अनबन होऊ शकते. एकलकोंडेपणा दूर करण्याचा प्रयत्न करावा.
 • मीन:-
  मुलांवरील खर्च वाढू शकतो. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. कौटुंबिक वातावरणात खेळकर असेल. हातातील कामात यश येईल. स्थावरची कामे मार्गी लागतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 15 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X