07 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १६ जून २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्‍याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.

वृषभ:-व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.

मिथुन:-बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

कर्क:-कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.

सिंह:-घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.

कन्या:-दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

तूळ:-जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:-व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.

धनू:-आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

मकर:-कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.

कुंभ:-भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

मीन:-अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 16th june 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, १५ जून २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १४ जून २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १३ जून २०२०
Just Now!
X