• मेष:-
    उत्तम वाहन सौख्य लाभेल. सर्वांशी मनमिळाऊपणे वागाल. घराची कामे करण्यात दिवस जाईल. तुमची चांगली छाप पडेल. काही ठिकाणी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल.
  • वृषभ:-
    वेगवेगळी कामे हाती घ्याल. विविध मार्गांनी आनंद उपभोगाल. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. महिलांच्या हातात पैसा खुळखुळेल. कामातून सुट्टी घेण्याचा विचार कराल.
  • मिथुन:-
    योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल. जवळच्या मित्रांमध्ये रमाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाचे प्रशस्तीपत्र मिळेल.
  • कर्क:-
    तिखट पदार्थ चाखाल. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. कोणताही भडक शब्द वापरू नये. कामाची दगदग जाणवेल.
  • सिंह:-
    मानीपणा दर्शवाल. वागण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. समाजात दर्जा निर्माण कराल. स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
  • कन्या:-
    तुमच्यातील राजकारणी गुण दिसून येईल. बौद्धिक चुणूक दाखवाल. स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. आपले मत उत्कृष्टपणे मांडाल. सर्व गोष्टी योग्यरीतीने जाणून घ्याल.
  • तूळ:-
    भावनेच्या भरात सर्व गोष्टी बोलू नका. परदेश गमनाची संधी चालून येईल. स्त्रीवर्गाच्या मुद्यात लक्ष घालू नये. पराक्रमाला चांगला वाव आहे. मित्रांशी वाद घालू नका.
  • वृश्चिक:-
    लहान मुलांमध्ये रमाल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. लबाड लोकांपासून सावध राहावे. व्यापारीवर्गाला चांगला फायदा संभवतो. मनाजोगी खरेदी कराल.
  • धनु:-
    कारकून वर्गाला लाभाची संधी मिळेल. आपला फायदा काढण्याकडे लक्ष द्यावे. व्यवहार चातुर्य दाखवावे. परिस्थितीचा अंदाज घ्यावा.चिकाटी धरून ठेवावी.
  • मकर:-
    तुमच्या कामाला प्रसिद्धी मिळेल. वाचनाची आवड पूर्ण कराल. सहकुटुंब प्रवास कराल. आपले मत ठामपणे मांडाल. कामात स्फूर्ती मिळेल.
  • कुंभ:-
    मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. कामात गतिमानता येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. पत्नीच्या मताचा विचार कराल. भागीदारीत संयम ठेवावा.
  • मीन:-
    विचार-विनिमयाने मुद्दा जाणून घ्याल. कौटुंबिक गोष्टीत रमून जाल. गोड पदार्थ चाखायला मिळतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. मुलांचा आनंद महत्त्वाचा ठरेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर