मेष

ॐ भगवते नमः. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

Mahashivratri 2024 Date time shubh muhurat puja vidhi signification
Mahashivratri 2024: महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
29 February Horoscope Marathi
२९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग: चार वर्षांतून एकदा येतो ‘हा’ खास दिवस! कसे असेल बारा राशींचे ग्रहमान, पाहा

वृषभ

ॐ अवदुताय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

ॐ स्वानंदाय नमः. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकारी वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ नारायणाय नमः. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहे. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. परदेशांशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –पिंगट

सिंह

ॐ श्रीनिवासाय नमः. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.
आजचा रंग -केशरी

कन्या

ॐ सुदर्शनाय नमः. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळीना प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक सौख्य लाभेल. कौटुंबिक कलह कमी होईल. सर्व क्षेत्रांमध्ये स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग –आकाशी

तुळ

ॐ मुकुंदाय नमः. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग -ऑफ व्हाईट

वृश्चिक

ॐ मंगेशाय नमः. धाडसी निर्णय घेऊ शकाल. मोठ्या निर्णयाचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग –पिवळा

धनु

ॐ प्राणवाय नमः. धाडसी निर्णय घेऊ शकाल.मोठ्या निर्णयाचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.
आजचा रंग –केशरी

मकर

ॐ चिन्मयाय नमः. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळीनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

कुंभ

ॐ क्रयमुर्तये नमः. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. कमाडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल.
आजचा रंग- जांभळा

मीन

ॐ मंगलमुर्तये नमः. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
आजचा रंग –पिंगट

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu