06 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १९ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कामात मन रमवावे. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. चारचौघात जपून बोलावे. भागीदाराशी समजुतीने वागावे.
 • वृषभ:-
  प्रवासाचा आनंद घ्याल. हातातील कलेचा सदुपयोग करावा. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. आवडते ग्रंथ वाचायला मिळतील. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल.
 • मिथुन:-
  शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडाल. हसत-खेळत कामे कराल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रेमळपणे सर्वांचे मन जिंकून घ्याल.
 • कर्क:-
  कौटुंबिक विसंवाद दूर करावेत. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराची मनधरणी करावी. प्रेम संबंध जपावेत.
 • सिंह:-
  मैत्रीतील दुरावा दूर करावा. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. वादात फार लक्ष घालू नये. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. चुकीचे विचार बाजूला सारावेत.
 • कन्या:-
  आरोग्यात सुधारणा होईल. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्यातील धाडस वाढेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्याने बोलणे टाळावे.
 • तूळ:-
  चुकीच्या संगतीत अडकू नका. अनाठायी खर्च वाढेल. योग्य तारतम्यता बाळगावी. अघळपघळ बोलू नका. कौटुंबिक खर्चावर लक्ष ठेवा.
 • वृश्चिक:-
  कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे. सामाजिक जाणिव जागृत ठेवावी. कागदपत्रे जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे.
 • धनु:-
  घरातील कार्यक्रमात सहभागी नोंदवाल. क्षणिक गोष्टींनी नाराज होऊ नका. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन मित्र मिळतील. जमिनीच्या कामात लाभ संभवतो.
 • मकर:-
  काही कामे जास्त श्रम करायला लावतील. बदलांना सकारात्मकतेने पहा. कमिशनच्या कामात लाभ संभवतो. आर्थिक चिंता मिटेल. मुलांच्या आनंदात रमून जाल.
 • कुंभ:-
  प्रवासात सतर्कता बाळगावी. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. मनातील इच्छा पूर्ण होतील. कलेला प्रसिद्धी मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल.
 • मीन:-
  लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. औषधोपचार वेळेवर घ्यावेत. पित्तामुळे चिडचिड वाढेल. करमणुकीचे खेळ खेळाल. रेस, जुगार यांमध्ये फायदा संभवतो.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 19 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, १८ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १७ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १६ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X