20 September 2019

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २० ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-
    कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. फार चिंता करू नये. प्रेमसंबंधातील गैरसमजुतीला मनात थारा देवू नका. संभाषणाची आवड पूर्ण कराल.
  • वृषभ:-
    उत्तम परीक्षण कराल. प्रकाशनाच्या कामात यश मिळेल. चिंतन, मनन कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक वजन वाढेल.
  • मिथुन:-
    व्यावसायिक लाभ मनाजोगा होईल. वडिलांचे चांगले सहकार्य लाभेल. गोड बोलून कामे साध्य कराल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. एकाच गोष्टीवर लक्ष द्यावे.
  • कर्क:-
    सर्वांशी नम्रतेने वागाल. हातातील कामात यश येईल. उपासनेची आवड पूर्ण कराल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. श्रद्धेवर अधिक भर द्याल.
  • सिंह:-
    आरोग्याची काळजी घ्यावी. खोट्या गोष्टींच्या मागे लागू नका. मोहात अडकू नका. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. उत्साहाने कामे कराल.
  • कन्या:-
    जुन्या कामात पुन्हा लक्ष घालावे लागेल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. खर्चाकडे लक्ष द्यावे. दिवस मनाजोगा घालवाल. कामातील बदल जाणून घ्यावेत.
  • तुळ:-
    विश्वासू लोकांकडून कामे होतील. नातेवाईकांचा गोतावळा जमेल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नये. कौटुंबिक सौख्यावर भर द्याल. योग्य संधीचा लाभ घ्यावा.
  • वृश्चिक:-
    आपल्याकडील ज्ञान इतरांना द्याल. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. चेष्टा, विनोद यात दिवस घालवाल. तुमचा अंदाज बरोबर येईल. पैज जिंकता येईल.
  • धनु:-
    तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींवरच फक्त लक्ष द्याल. मन:शांती लाभेल. आत्मिक आनंद लाभेल. मोठ्यांचा आशिर्वाद मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल.
  • मकर:-
    जवळचा प्रवास मजेत होईल. स्मरणशक्तीच्या जोरावर कामे कराल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. मनाची चंचलता दूर करावी. आवडते पुस्तक वाचाल.
  • कुंभ:-
    नातलगांना आर्थिक मदत कराल. योग्य गोष्टींचा पाठपुरावा कराल. गोड पदार्थ चाखाल. आवडीबाबत आग्रही राहाल. सर्वांशी गोड बोलाल.
  • मीन:-
    आर्थिक बाबींकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. फसवणुकीपासून सावध राहावे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यातील समंजसपणा दिसून येईल. सर्वांना आपलेसे कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on August 20, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 20 august 2019 aau 85