1. मेष:-
    कामात स्त्रियांची मदत मिळेल. इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. व्यावसायिक गोष्टींना अधिक महत्व द्याल. आपले अस्तित्व दाखवून द्याल. सत्ता मिळवण्याचा प्रयत्न कराल.
  2. वृषभ:-
    स्वभावात काहीसा मानीपणा येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. आपला दर्जा टिकविण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्नात कसूर करू नका. जोडीदाराला समजून घ्यावे.
  3. मिथुन:-
    काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. सकस अन्न घ्यावे. प्रकृतीची हेळसांड करू नये. वैचारिक शांतता जपावी. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल.
  4. कर्क:-
    जोडीदाराचा निश्चय समजून घ्यावा. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा माराल. मुलांच्या स्वछंदतेत वाढ होईल.
  5. सिंह:-
    कामाचा चांगला उरक वाढेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची कल्पकता दिसून येईल.
  6. कन्या:-
    बौद्धिक दिमाख दाखवाल. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. आपल्या बुद्धीचा सदुपयोग करता येईल. प्रवासात काळजी घ्यावी.
  7. तूळ:-
    उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होईल. अघळ-पघळ बोलाल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. संभाषणाची आवड पूर्ण कराल. घरात मित्रांचा गोतावळा जमवाल.
  8. वृश्चिक:-
    चौकसपणे गोष्टी जाणून घ्याव्यात. योग्य तर्क काढता येईल. प्रगतीच्या दृष्टीने काही गोष्टींचे चिंतन करावे. बोलताना भान राखावे. भावंडांची मदत होईल.
  9. धनू:-
    दिवस गप्पांमध्ये व्यतीत कराल. आपल्या मतावर ठाम राहाल. कमिशनमधून फायदा मिळेल. व्यावहारिक चातुर्य दाखवाल. हसत-खेळत कामे कराल.
  10. मकर:-
    आपल्या भावना उत्तम रीतीने मांडाल. स्मरणशक्तीचा वापर करता येईल. वागण्यात धूर्तपणा दाखवाल. आपल्या मतावर आग्रही राहाल. हजरजबाबीपणे बोलणे ठेवाल.
  11. कुंभ:-
    जामीनकीचे व्यवहार तूर्तास बाजूला ठेवावेत. रहस्यमय गोष्टींची आवड दर्शवाल. प्रवासाची आवड पूर्ण करता येईल. फसवणुकीपासून सावध राहावे. कागदपत्रांची योग्य छानणी करावी.
  12. मीन:-
    मोठ्या लोकांशी मैत्री होईल. लहान मुलांच्यात रमून जाल. गप्पिष्ट मित्रांचा सहवास लाभेल. व्यापारात चांगला लाभ होईल. आपल्या ज्ञानात भर पडेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर