मेष:-कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका. घरगुती कामात अधिक वेळ जाईल.

वृषभ:-कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाहेर वावरतांना सावध राहावे. मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.

मिथुन:-कामाच्या व्यापाने थकून जाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. प्रकृतीच्या बाबत चिकित्सक राहाल.

कर्क:-वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. वैचारिक थकवा जाणवेल.

सिंह:-कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. वात विकारांचा त्रास जाणवेल. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

कन्या:-मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल. कमिशनचा चांगला लाभ मिळेल.

तूळ:-वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल.

वृश्चिक:-सकारात्मक विचाराने वागावे. व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अति साहस करायला जाऊ नका.

धनू:-कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत. हाताखालील लोक सहकार्य करतील.

मकर:-एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. तुमची चिकाटी आज उपयोगी पडेल. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.

कुंभ:-संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे. अनाठायी खर्च होऊ शकतात.

मीन:-क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा. करमणुकीच्या गोष्टीत मन रमवा.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर