मेष
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

वृषभ
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा

सिंह
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

कन्या
गणपती मंदिरात पांढऱ्या वस्तू अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – नारंगी

तुळ
गणपती मंदिरात अभिषेक करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारंना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

धनु
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – आकाशी

मकर
गणपती मंदिरात गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरात फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग- पांढरा

मीन
दत्त महाराजांची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकाराकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu