26 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस शांततेत जाईल. घरातील कामाचा आनंद घ्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. जवळची माणसे भेटतील.
 • वृषभ:-
  भावंडांमधील प्रेमसौख्य वाढेल. स्वभावात भावनिकता जाणवेल. कामात चंचलता आणून चालणार नाही. आवडते पुस्तक वाचाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल.
 • मिथुन:-
  कौटुंबिक सौख्याचा दिवस. आवडीच्या गोष्टी कराल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कौटुंबिक खर्चावर विचार कराल. उथळपणे बोलणे टाळावे.
 • कर्क:-
  भावनिक विचार कराल. तुमच्यातील प्रेमळपणाचा सर्वांना प्रत्यय येईल. दिवस आनंदात जाईल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. आरोग्यात सुधारणा होईल.
 • सिंह:-
  एखादी चांगली संधी चालून येईल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येईल. उघडपणे बोलणे टाळाल. दानधर्माचे महत्त्व जाणाल. मानसिक चंचलता जाणवेल.
 • कन्या:-
  उत्कृष्ट आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामाची धावपळ वाढू शकते. जवळचे मित्र भेटतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
 • तूळ:-
  वडिलांचा मौलिक सल्ला मिळेल. कामात एकसूत्रीपणा ठेवावा. कामांच्या ठिकाणी सर्वांचा विश्वास संपादन कराल. व्यापारीवर्गाला चांगला फायदा होईल. घरातील प्रेमळ वातावरणात रमाल.
 • वृश्चिक:-
  धार्मिक कामात हातभार लावाल. तुमच्यातील प्रेमळपणाचे कौतुक केले जाईल. पुढील गोष्टींचा अंदाज घ्यावा. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. संधीचे सोने करावे.
 • धनु:-
  अचानक धनलाभ संभवतो. मनाची व्यग्रता टाळावी. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. चांगला व्यावसाईक लाभ संभवतो. मित्रांमध्ये रमून जाल.
 • मकर:-
  सरकारी कामात वेळ जावू शकतो. कलेला चांगला उठाव मिळेल. ओळखीतून कामे पार पडतील. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामात दिवस जाईल.
 • कुंभ:-
  कामात किरकोळ अडचणी येवू शकतात. वरिष्ठांना खुश करावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. काही कामे तुमचा कस पाहतील. चांगल्या संगतीत दिवस घालवाल.
 • मीन:-
  काही कामे सहजरीत्या पार पडतील. अचानक लाभाची शक्यता. योग्य संधीची वाट पहावी लागेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. बैठ्या खेळात मन रमवाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 22 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २० ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X