27 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष-चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.

वृषभ:-जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.

मिथुन:-चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील.

कर्क:-मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.

सिंह:-आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.

कन्या:-प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.

तूळ:-बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

वृश्चिक:-आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.

धनू:-मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

मकर:-जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:-नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी.

मीन:-चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 22 september 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २० सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ सप्टेंबर २०२०
Just Now!
X