• मेष:-
    कौटुंबिक जबादारी वाढेल. काही क्षुल्लक समस्या सोडवाल. भावंडांच्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. अतिविचार करू नका. कफ विकाराचा त्रास जाणवेल.
  • वृषभ:-
    व्यावहारिक कुशलता दाखवाल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. स्वाभाविक दोष दूर करण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. व्यापारात नवीन संधी उपलब्ध होतील.
  • मिथुन:-
    खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचा विश्वास संपादन करावा. नसत्या भांडणात पडू नका. लबाड माणसांपासून दूर राहावे. चुकीच्या विचारांना बाजूला सारावे.
  • कर्क:-
    घरगुती कलह सामंजस्याने सोडवावेत. जमिनीची कामे निघतील. बौद्धिक गोष्टींनी लक्ष वेधून घ्याल. मुलांचे प्रश्न सोडवाल. खरेपणाची कास धरावी.
  • सिंह:-
    संभाषणाची आवड पूर्ण होईल. घरात नातेवाईक गोळा होतील. नवीन मित्र जोडाल. चांगले गृहसौख्य लाभेल. तुमचा प्रेमळपणा दिसून येईल.
  • कन्या:-
    तर्कशुद्ध विचार करावा. आकलन शक्तीचा योग्य वापर कराल. भावंडांचे सौख्य लाभेल. नवीन माहिती गोळा कराल. आवडते पुस्तक वाचाल.
  • तूळ:-
    आर्थिक आवक वाढविण्यासाठी नवीन पर्याय शोधाल. पित्तविकार बळावू शकतात. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. कमिशन मधून फायदा शोधाल.
  • वृश्चिक:-
    अभ्यासूवृत्तीने वागणे ठेवाल. सर्व गोष्टीत तत्परता दाखवाल. स्मरणशक्तीचा योग्य वेळी वापर करता येईल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्याल.
  • धनु:-
    मानसिक शांतता जपावी. काही कामात अडथळा येऊ शकतो. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. गायन कला जोपासावी.
  • मकर:-
    खर्च वाढू शकतो. नैराश्य बाजूला सारावे. उगाचच चिंता करत बसण्याचे कारण नाही. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. लहानांशी मैत्री कराल.
  • कुंभ:-
    व्यावसायिक वाढ करता येईल. आरोग्यात सुधारणा होईल. कामाची गडबड राहील. आदरणीय व्यक्तींची ओळख होईल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल.
  • मीन:-
    अपवादांकडे दुर्लक्ष करावे. मनातील इच्छा पूर्ण होतील. मोठ्या लोकांची संगत लाभेल. हातातील कामात अपेक्षित यश येईल. सर्वांशी सहृदयतेने वागाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर