मेष

ॐ विश्वात्मने नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पिवळा

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
4th April Panchang Rashi Bhavishya Guruvaar
४ एप्रिल राशी भविष्य: गुरुवारी श्रवण नक्षत्रात मेष ते मीन पैकी कुणाचे नशीब चमकणार? धन, आरोग्य कसे असेल?

वृषभ

ॐ गुणेशाणाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल.
आजचा रंग –नारंगी

मिथुन

ॐ परात्पराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. लाभदायक ग्रहमान आहेत. व्यवसायिकांना, नोकरदारमंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग – हिरवा

कर्क

ॐ गुणातिताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –पोपटी

सिंह

ॐ गणंजाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदारामंडळींना दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ विश्वरूपाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी. मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.
आजचा रंग –लाल

तुळ

ॐ महाकालाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. संतती सौख्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत. मोठे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ॐ प्रभवे नमः मंत्र म्हणाव. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बांधकाम व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. प्रवासाचे योग संभवतात. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –आकाशी

धनु

ॐ पुरूषोत्तमाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. कामाचा ताण जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील. स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ श्रीरामाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये बढतीचे, पगारवाढीचे योग आहेत. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचे दिवस आहेत.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

ॐ रामदुताय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल. महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी.
आजचा रंग- लाल

मीन

ॐ कल्याण्यै नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वादविवाद टाळावेत. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu