News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २७ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  महत्वाच्या गोष्टी विसरु नयेत. प्रेमात अधिकारवाणी आणू नये. बैठे खेळ खेळाल. प्रवासात काळजी घ्यावी. महत्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी.
 • वृषभ:-
  उगाचच त्रागा करू नका. घरगुती कामात लक्ष घालाल. मानसिक शांतता जपावी. घरगुती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा. चुकीचे संदर्भ टाळावेत.
 • मिथुन:-
  उत्साहाच्या भरात कामे हाती घ्याल. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. विचार भरकटू देवू नका. एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा.
 • कर्क:-
  गुंतवणुकीबाबत सावधानता बाळगावी. दृष्टीकोन बदलून पाहावा. काटकसरीकडे लक्ष द्यावे. तामसी पदार्थ खाणे टाळावेत. अतिविचारांच्या नादात भावनेच्या आहारी जाणे टाळावे.
 • सिंह:-
  गप्पांमधून जवळीक वाढेल. कामाची दग-दग राहील. अडथळयातून मार्ग काढाल. काही गोष्टींमध्ये तडजोड करावी. भावनेला आवर घालावी लागेल.
 • कन्या:-
  मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही बाबतीत संयम राखून वादाचे प्रसंग टाळावेत. झोपेची तक्रार मिटेल.
 • तुळ:-
  उत्तम व्यवसायिक लाभ होईल. मनातील आकांक्षांना मूर्त रुप द्याल. मान-सन्मानास पात्र व्हाल. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.
 • वृश्चिक:-
  काही कामांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. मोठ्या लोकांची संगत लाभेल. अपेक्षित धन प्राप्ती होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल.
 • धनु:-
  वयोवृद्धांचा मान राखावा. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आपला मान जपावा. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कामाचा ताण जाणवेल.
 • मकर:-
  जोडीदाराविषयी गैरसमज करु नयेत. क्षुल्लक कारणांवरून वाद घालू नका. कामात एकाग्रता ठेवावी. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीच्या संगतीत अडकू नका.
 • कुंभ:-
  आलेल्या संधीचा फायदा घ्यावा. तुमचा जनसंपर्क वाढेल. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी होणारे मतभेद टाळावेत. एकमेकांची बाजू समजून घ्यावी.
 • मीन:-
  क्षणिक मोहाला बळी पडू नका. विरोधकांना जिंकता येईल. हातातील कामे पूर्ण होतील. कामाचा आनंद मिळेल. चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नये.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 27 august 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २६ ऑगस्ट २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २५ ऑगस्ट २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ ऑगस्ट २०१९
Just Now!
X