मेष
मारूती स्त्रोत म्हणावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

वृषभ
गणपती अर्थव शीर्ष पठण करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – आकाशी

मिथुन
गणपती आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पांढरा

कर्क
ओम श्रीं क्लीम भगवतैय नम: या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह
मारूतीचे दर्शन घ्यावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कन्या
लक्ष्मी दर्शन घ्यावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नेव्ही ब्ल्यू

तुळ
दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घेणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
ओम गं गणपतैय नम: या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पोपटी

धनु
गणपती स्त्रोत म्हणावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढल जपून करावी.
आजचा रंग – हिरवा

मकर
गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत पठण करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. कौटुंबीक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन करावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग- राखाडी

मीन
कुलस्वामिनीचे चिंतन करावे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – नारंगी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu