मेष

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतरचा वेळ आनंदात जाईल. गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करणे.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. . मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. आज गणेश स्तुती म्हणणे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे ओटी भरणे.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. महादेवाच्या मंदिरात एक मूळ तांदूळ अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम श्री क्लीम नमः जप करणे.
आजचा रंग – केशरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. ओम नमः शिवाय जप करावा. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – राखाडी

मकर

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोत्राचा पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत आणि साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. महादेवाचे स्मरण करुन ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आज दिवसभर अथर्वशीर्ष ऐकावे किंवा पाठ करावे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu