News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २८ नोव्हेंबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

मारूती स्तोत्र म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे आर्थिक नियोजन करीत असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – लाल

वृषभ

गणपती अथर्व शीर्ष पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग –आकाशी

मिथुन

गणपती आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. अधिकारी व्यक्तींसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यात्मिकता वाढेल.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

ॐ श्री क्लींम भगवते नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

सिंह

मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग -हिरवा

कन्या

लक्ष्मीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होईल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

तुळ

दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. वातविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -हिरवा

वृश्चिक

ॐ गँ गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होईल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग –निळा

धनु

गणपती स्तोत्र म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गृह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पांढरा

मकर

गणपती दर्शन आणि गणपती स्तोत्र पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस. प्रगतीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदी जाईल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवते.
आजचा रंग – लाल

कुंभ

कुलदैवतांचे स्मरण आणि दर्शन करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- आकाशी

मीन

कुलस्वामिनीचे चिंतन करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगाई नको.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 28 november 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २७ नोव्हेंबर २०१७
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २६ नोव्हेंबर २०१७
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २५ नोव्हेंबर २०१७
Just Now!
X