29 October 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३० जून २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.

वृषभ:-दिवस आनंदात जाईल. नवीन कामात हात घालाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.

मिथुन:-रेस, जुगार यातून लाभ संभवतो. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.

कर्क:-घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाचा यथायोग्य आनंद मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.

सिंह:-प्रवास हसत-खेळत पार पडेल. जवळचे मित्र भेटतील. दिवस आनंदात जाईल. अधिकार्‍यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

कन्या:-कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल. काही कामांचे मनन कराल. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.

तूळ:-दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

वृश्चिक:-मनात चलबिचलता जाणवेल. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक कामात मन गुंतवावे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.

धनू:-पारमार्थिक कामात मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.

मकर:-कामातील अडचणी दूर होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो. घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तु खरेदी केल्या जातील. टापटि‍पेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.

मीन:-शेअर्स मधून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:24 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 30th june 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २९ जून २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २८ जून २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २७ जून २०२०
Just Now!
X