• मेष:-
    दिवस आळसात उगवेल. स्त्री समूहात वावराल. व्यवसायात चांगला लाभ होईल. मुलांच्या आनंदाने भारावून जाल. सुखासक्तपणा जाणवेल.
  • वृषभ:-
    तुमचे मत अधिक ग्राह्य धरले जाईल. सामाजिक वजन वाढेल. घरातील कामात अधिक वेळ जाईल. उत्तम गृहसौख्य राहील. घरातील वातावरण आनंदी असेल.
  • मिथुन:-
    धार्मिक गोष्टींची आवड दर्शवाल. सेवेचे महत्व लक्षात घ्याल. तुमच्या कामाची वाखाणणी केली जाईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात एकसूत्रता ठेवावी.
  • कर्क:-
    मानसिक चिंता सतावेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. अचानक धनलाभ संभवतो. आरोग्यात फरक दिसून येईल.
  • सिंह:-
    उत्तम वैवाहिक सौख्याचा दिवस. दिवस शांततेत जाईल. भागीदारीत उत्तम लाभ होईल. घरगुती प्रश्नात लक्ष घालावे. कामात सुस्तपणा आड येऊ शकतो.
  • कन्या:-
    लहान-सहान गोष्टी नजरेआड कराव्यात. परिस्थितीला नावे ठेवू नका. उगाच चिडचिड करू नका. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. हातातील अधिकार वापरावे लागतील.
  • तूळ:-
    परिस्थितीचे योग्य आकलन कराल. कामात चलाखी दाखवाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वच्छंदीपणे वागाल. कलेचा मनमुराद आनंद घ्याल.
  • वृश्चिक:-
    उष्णतेचे त्रास वाढू शकतात. चांगले गृहसौख्य राहील. कौटुंबिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्यातील चिकाटी वाढवावी. घाईघाईने कोणत्याही कामात हात घालू नका.
  • धनु:-
    भावंडांचे सौख्य वाढेल. एकमेकांतील एकोपा वाढीस लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मानसिक चंचलता जाणवेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल.
  • मकर:-
    तुमचा आनंद द्विगुणित होईल. दिवस मानाजोगा व्यतीत कराल. आवडते पदार्थ चाखाल. चांगला आर्थिक लाभ होईल. हौस भागवण्याची संधी मिळेल.
  • कुंभ:-
    तुमचे कौतुक केले जाईल. बदलांचा स्वीकार करावा. अधिकारात वाढ संभवते. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.
  • मीन:-
    मनाची दोलयमानता जपावी. विचारात वाहून जाऊ नका. मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे. वरिष्ठांना खुश ठेवावे. सरकारी कामात वेळ लागू शकतो.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर