05 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल. आपला छंद उत्तमरीत्या जपाल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल.
  • वृषभ:-मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काहीशी गुप्तता बाळगाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
  • मिथुन:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.
  • कर्क:-दिवस आळसात घालवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. अंगीभूत कलागुण वाढीस लागतील. चैनीकडे कल राहील.
  • सिंह:-कलेला पोषक वातावरण लाभेल. आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. लेखकांना कलागुण विकसित करता येतील. घरात टापटीप ठेवाल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.
  • कन्या:-सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीची मदत मिळेल. बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाचा दर्जा सुधाराल.
  • तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.
  • वृश्चिक:-भागिदारीतून चांगली कमाई होईल. इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी. नातेवाईकांकडून मदत मिळेल. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल.
  • धनू:-कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. आत्मिक समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
  • मकर:-आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल. क्षुल्लक गोष्टींमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी प्रेमाने वागाल.
  • कुंभ:-हस्तकलेसाठी वेळ काढा. प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगावा.
  • मीन:-मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामातील बदल लक्षात घ्यावेत.

       – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 3rd march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य,सोमवार, २ मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X