मेष:-कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत.

वृषभ:-जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल. न्यायी वृत्तीने वागाल. कर्मठ विचार दर्शवू नका.

मिथुन:-पारंपरिक कामात यश येईल. वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मोहात अडकू नका. स्पष्ट विचार नोंदवा.

कर्क:-आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

सिंह:-सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

कन्या:-व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे.

तूळ:-गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:-खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल.

धनू:-चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी.

मकर:-मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे.

कुंभ:-काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा.

मीन:-थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर