News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ०१ जानेवारी २०२०

जाणून घ्या, कसा असेल तुमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस ?

 • मेष:-
  कल्पनांना नवीन भरारी घेतली जाईल. नवीन कपडेलत्ते घेतले जातील. कामात वडिलांची मदत घेता येईल. आर्थिक कामे सुरळीतपणे पार पडतील. उत्तम स्त्रीसौख्य लाभेल.
 • वृषभ:-
  कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. प्रवासात तब्बेतीची काळजी घ्यावी. घरातील कामे वाढतील. इतरांच्या मदतीला धावून जाल. वादाचे प्रसंग टाळावेत.
 • मिथुन:-
  जोडीदाराचा प्रभाव जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर विजय मिळविला जाईल. तुमचा मान वाढेल. चांगला आर्थिक लाभ होईल.
 • कर्क:-
  विचारांना योग्य दिशा द्यावी. भावनांना आवर घालावी. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.
 • सिंह:-
  घरातील क्षुल्लक कुरबुरीकडे लक्ष द्यावे. भागीदारीत चांगला लाभ मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांच्या काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.
 • कन्या:-
  हाताखालील लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. काही वेळेस अपेक्षाभंग होऊ शकतो. नातेवाईकांच्या भेटी घडतील. अधिकाराची जाणीव ठेवावी. कौटुंबिक खर्च विचारात घ्यावा.
 • तूळ:-
  चोरांपासून सावध राहावे. द्वेषाला बळी पडू नका. एखादे काम अकारण अडून राहू शकते. घरातील स्वच्छता हाती घ्याल. बोलतांना सावध राहावे.
 • वृश्चिक:-
  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. जुनी कामे सामोरी येतील. घरातील टापटीप ठेवण्यात अधिक वेळ घालवाल. पित्ताचा त्रास जाणवेल.
 • धनु:-
  कामाची दगदग राहील. थोडा स्वतः साठी वेळ द्यावा. निर्णय घेताना ठामपणा ठेवावा. आवडत्या गोष्टीत मन रामवावे. जवळचा प्रवास कराल.
 • मकर:-
  सर्वाना आनंदात सहभागी करून घ्याल. चैन करण्याकडे लक्ष राहील. वाणीत गोडवा ठेवाल. उत्तम वैवाहिक सौख्य राहील. काही कामे तुमचा कस पाहतील.
 • कुंभ:-
  केलेल्या कामाचे समाधान लाभेल. मनाप्रमाणे गोष्टी कराल. इच्छेला मूर्त रूप द्याल. मोठ्या व्यक्तींशी मैत्री कराल. ओळखीचा चांगला लाभ होईल.
 • मीन:-
  मानसिक चंचलता जाणवेल. आपली इच्छा पूर्ण होताना दिसेल. कौटुंबिक गोष्टी मार्गी लागतील. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. जवळचे मित्र भेटतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 01 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ३० डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २९ डिसेंबर २०१९
Just Now!
X