• मेष:-
    नवीन कल्पनांना मूर्त रूप द्याल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. तुमची कला इतरांसमोर सादर करता येईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. कामात प्रगती करता येईल.
  • वृषभ:-
    एकसूत्री काम आखावे. वारसाहक्काची कामे निघतील. अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून मिळणाऱ्या गोष्टींबाबत सतर्क राहावे. सासुरवाडीची मदत घेता येईल.
  • मिथुन:-
    जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. वैवाहिक सौख्य वृद्धिंगत होईल. तुमचे चारचौघात कौतुक होईल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. सकारात्मक विचार दर्शवाल.
  • कर्क:-
    अचानक धनलाभ संभवतो. मानसिक स्थैर्य जपावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातलगांची मदत मिळेल.
  • सिंह:-
    भागीदारीत नवीन कल्पना रुजवाल. कौटुंबिक स्तरावर समाधानी असाल. नवीन मित्र जोडाल. पत्नीचे कौतुक कराल. घरातील गोष्टींकडे लक्ष द्यावे.
  • कन्या:-
    स्थावरची कामे काढली जातील. खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरगुती कार्यक्रम आयोजित केले जातील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
  • तूळ:-
    उगाचच होणारी चिडचिड टाळावी. पित्ताचा त्रास जाणवेल. गप्पागोष्टींत रमाल. कर्तव्यतत्परता दाखवाल. कामाचा उरक वाढेल.
  • वृश्चिक:-
    अति श्रमामुळे थकवा जाणवेल. प्रकृतीच्या बाबत हयगय करू नका. मनात अकारण कसलीशी चिंता सतावत राहील. आवक-जावक यांचा मेळ घालावा लागेल. सूर्योपासना करावी.
  • धनु:-
    सर्व गोष्टींमध्ये आनंद मानून घ्याल. अंगीभूत कला जोपासाल. चिकाटी सोडू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग निघेल.
  • मकर:-
    ओळखीतून काम करत येईल. काही बदल स्वीकारावेत. समाधान मानून पुढे चालावे. आध्यत्मिक गोष्टींचा अनुभव घ्यावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
  • कुंभ:-
    गोष्टी मनाप्रमाणे करून घ्याल. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. सरकारी कामात अडकून पडाल. आपल्या इच्छेला महत्व द्याल. मोलाचा सल्ला मिळेल.
  • मीन:-
    मनातील अस्थिरता काढून टाकावी. प्राणायाम, ध्यानधारणा यात मन रामवावे. सर्वांचा आदर राखाल. वरिष्ठांना खुश करावे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर