02 March 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  इतरांना मदत करण्यात तत्परता दाखवाल. नवीन मित्र जोडाल. करमणुकीच्या कार्यात भाग घ्याल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल.
 • वृषभ:-
  वाहन विषयक कामे पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात लक्ष घालाल. गृहसौख्यावर अधिक लक्ष द्यावे. कामे अपेक्षेनुसार पूर्ण होतील. कामातून आनंद मिळेल.
 • मिथुन:-
  अधिक जोमाने कामे कराल. धाडसाने कामे हाती घ्याल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कमिशनच्या कामातून फायदा संभवतो. कामाचे कौतुक केले जाईल.
 • कर्क:-
  थोरांचा प्रेमळ सहवास लाभेल. नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. खाण्या-पिण्याची आवड दर्शवाल. काही कामात अधिक श्रम पडतील. उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतात.
 • सिंह:-
  जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. चिडचिड करणे टाळावे. जोमाने कामे कराल. श्रम व दगदग वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
 • कन्या:-
  कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. काही गोष्टी बोलतांना सावधगिरी बाळगावी. मन प्रसन्न ठेवावे. तुमची उत्तम छाप पडेल. झोपेची तक्रार जाणवेल.
 • तूळ:-
  सर्वांना आनंदात सहभागी करुन घ्याल. चौकस दृष्टीकोन ठेवाल. तुमच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. मोठ्या लोकांच्या मदतीने कामे पार पडतील. गप्पांमध्ये रंगून जाल.
 • वृश्चिक:-
  सरकारी कामात अडथळे येवू शकतात. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. जुनी कामे अंगावर येतील. विरोधकांची संख्या वाढू शकते. कामातील बदल सकारात्मकतेने घ्यावेत.
 • धनु:-
  संयम राखावा लागेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्या कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. हातातील अधिकाराचा वापर कराल. इतरांना तुमचे कार्य पटवून द्याल.
 • मकर:-
  क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढवू नका. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. अचानक धनलाभाची शक्यता. मज्जातंतूंवर ताण येवू शकतो. व्यायामावर लक्ष द्यावे.
 • कुंभ:-
  सामाजिक कामात सहभाग नोंदवावा. वरिष्ठांना खुश कराल. शैक्षणिक कामे पार पडतील. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
 • मीन:-
  फार विचार करु नका. चंचलतेवर मात करावी लागेल. कामात यथायोग्य पार पडतील. नातेवाईकांना मदत कराल. सासुरवाडीचे सहकार्य मिळेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 04 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०३ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०२ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ०१ सप्टेंबर २०१९
Just Now!
X