05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ०६ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  नवीन ओळखी होतील. व्यापरी वर्ग खुश असेल. शेअर्सच्या कामातून पैसे मिळेल. चुकीच्या पद्धतीने विचार मांडू नका. पोटाचे त्रास जाणवतील.
 • वृषभ:-
  स्वभावात उधलेपणा येईल. प्रेमप्रकरणातील दुरावा दूर करावा. शक्यतो वेळ चुकवू नका. जुगारातून नुकसान संभवते. मुलांची मते जाणून घ्यावीत.
 • मिथुन:-
  जवळचे नातेवाईक भेटतील. कामातून चांगली कमाई होईल. कोणताही वाद ओढवून घेऊ नका. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. नसती काळजी करत बसू नये.
 • कर्क:-
  नातेवाईकांच्यात रमून जाल. हातातील कामांकडे विशेष लक्ष द्यावे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नाटक, सिनेमा बघायला जाल. लहान सहल आयोजित कराल.
 • सिंह:-
  अपयशाने खचून जाऊ नका. चोरांपासून सावध राहा. हितशत्रू त्रासदायक ठरू शकतात. वाढता खर्च आटोपता घ्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत.
 • कन्या:-
  पित्तविकार त्रास देऊ शकतात. उगाच चिडचिड करू नका. झेपेल इतकेच काम करायला घ्या. कौटुंबिक खर्च नियंत्रित ठेवावा. हातातील कला जोपासावी.
 • तूळ:-
  कामाचा ताण जाणवेल. एकाच कामात दिवसभर अडकून राहाल. मानाजोगी खरेदी कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. थोडा मानसिक ताण जाणवेल.
 • वृश्चिक:-
  जमिनीच्या कामात लक्ष घालावे. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गप्पांमध्ये रमून जाल. दिवस चैनीत व्यतीत कराल.
 • धनु:-
  काही कामे अधिक कस पाहतील. प्रयत्नात कसूर करू नका. कौटुंबिक काळजी करत बसू नका. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. कागदपत्रे जपून ठेवावीत.
 • मकर:-
  लहानांशी मैत्री कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्री सहवासात रमाल. योग्य संधीची वाट पाहावी.
 • कुंभ:-
  दिवस मानाजोगा घालवाल. नातेवाईकांना मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी. मनातून नैराश्य बाजूला सारावे. आपली प्रतिष्ठा जपावी.
 • मीन:-
  एकमेकांची बाजू समजून घ्यावी. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. काही अपवादांकडे दुर्लक्ष करावे. उपासनेत वेळ घालवावा. पोटाचे विकार जाणवतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 06 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०५ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०४ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ०३ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X