• मेष:-
    आशावादी दृष्टिकोन ठेवाल. तुमच्या बोलण्याच्या प्रभाव पडेल. वागण्यात कुशलता दाखवाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.
  • वृषभ:-
    दिवस मजेत घालवाल. तुमच्यातील प्रेमळपणाची बाजू दिसेल. अतिविचार करू नका. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. तुमच्या अनुमानास निश्चिती मिळेल.
  • मिथुन:-
    आपल्या स्वभावाकडे डोळसपणे पाहावे. चारचौघात कौतुक केले जाईल. व्यवहार कुशलता दाखवाल. सारासार विचारांची जोड घ्यावी. मानसिक शांतता जपावी.
  • कर्क:-
    कामातून समाधान शोधावे. हाताखालील लोकांवर चकटन विश्वास टाकू नका. नातेवाईकांचे प्रश्न निर्माण होतील. मुलांची बाजू समजून घ्यावी. कामे वेळेत पूर्ण करावीत.
  • सिंह:-
    बौद्धिक चूणूक दाखवाल. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. कामात सातत्य ठेवावे. तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी. अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवाल.
  • कन्या:-
    स्थावर संबंधीचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या जाणून घ्या. मनातील निराशा बाजूला सारावी. मित्रांच्या सहवासात रमून जाल. प्रवास साधगिरीने करावा.
  • तूळ:-
    तुमचा आत्मविश्वास वाढेल. कर्तुत्वाला चांगली संधी मिळेल. भावंडांचे प्रश्न निर्माण होतील. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. अचानक धनलाभ संभवतो.
  • वृश्चिक:-
    कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कर्ज घेताना विचार करावा. हातातील कलेला उत्तेजन दयावे. भागीदारीत चांगला लाभ संभवतो. अडचणीतून मार्ग काढावा.
  • धनु:-
    आळस बाजूला सारावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामातून आनंद मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील. सामाजिक बाबतीत फार लक्ष घालू नका.
  • मकर:-
    जमिनीच्या कामातून लाभ होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे. कष्ट थोडेफार वाढू शकतात. घेतलेल्या श्रमाचे चीज होईल.
  • कुंभ:-
    कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. सहकाऱ्यांची बाजू जाणून घ्यावी. नसत्या गोष्टींत लक्ष घालू नका. आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा. विरोधकांवर लक्ष ठेवा.
  • मीन:-
    प्रयत्नात कसूर करू नका. आपला मान जपण्याचा प्रयत्न कराल. प्रवासात काळजी घ्यावी. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर