• मेष:-
    जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. प्रेम सौख्यात भर पडेल. कर्तव्यदक्षता दाखवण्यात मागे हटू नका. नि: स्वार्थीपणे मदतीला धावून जाल. समाधानी असाल.
  • वृषभ:-
    आपल्यातील गुणांना वाव द्यावा. हाताखालील व्यक्तींची योग्य मदत मिळेल. आळस बाजूला सारवा. मोहाच्या बळी पडू नका. नातेवाईकांनी मदत घ्यावी लागेल.
  • मिथुन:-
    निसर्गाच्या सानिध्यात रमाल. मजेत दिवस घालवाल. वादन कलेचे कौतुक केले जाईल. करमणूकीची हौस पूर्ण कराल. सर्जनशीलता दाखवाल.
  • कर्क:-
    निर्मळपणे सर्वांना आपलेसे करून घ्याल. घरात समाधान नांदेल. अतंरीचे समाधान लाभेल. बागकामाची आवड जोपासाल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल.
  • सिंह:-
    छंद जोपासण्याची आवड पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी वृत्तीने वागल. कल्पना शक्तीला वाव मिळेल. वाचनत रमून जाल.
  • कन्या:-
    कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काटकसरीने वागाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. सर्वांशी गोड बोलाल. इतरांवर चांगली छाप पाडाल.
  • तूळ:-
    वागण्यात विषयासक्तपणा दिसून येईल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. आवडते पदार्थ चाखायला मिळतील. हौस पूर्ण कराल.
  • वृश्र्चिक:-
    लपवाछपवी कराल. दुरच्या प्रवसाचा योग येईल. फसवणूकीपासून सावध राहा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.
  • धनु:-
    वागण्यात शालिनता दर्शवाल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम लाभ मिळेल. आर्थिक गरज पूर्ण होईल.
  • मकर:-
    औद्योगीक वातावरण चांगले असेल. नशीब आजमवायला मिळेल. पतीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. इतरांचे मन जिंकून घ्याल.
  • कुंभ:-
    मनाची विशालता दाखवाल. धार्मिक वृत्ती जोपासली जाईल. कलेला पोषक वातावरण मिळेल. लेखन प्रसिद्ध होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
  • मीन:-
    कमी श्रमात कामे होतील. वारसाहक्काची कामे निघतील. सांपत्तिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. अचानक धनलाभ होईल. रेस, सट्टा यातून फायदा संभवतो.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर