मेष

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. आजचे ग्रहमान सर्व प्रकारच्या पाठपुराव्यांसाठी योग्य आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होतील. देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. वादविवाद टाळावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. ओम क्लीम ही मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. सर्व प्रकारच्या लाभासाठी उत्तम दिवस आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे. कालीमातेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. व्यवसायात प्रगती कराल. जबाबादाऱ्या पार पाडाल, मोठे निर्णय घ्याल. नोकरदारांनी जपून निर्णय घ्यावे. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. दुरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ निवांत जाईल. ओम भानवे नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – लाल

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. मोठे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस करू नये. गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली बातमी समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस. गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – क्रीम

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी, कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. गणपती मंदिरामध्ये गुळ खोबरे ठेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

धनु

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. मुलांशी निगडित किंवा भावंडांशी निगडित चांगली बातमी समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. गणपती मंदिरात लाल फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. अधिकारी वर्गासाठी दगदगीचा दिवस आहे. ओम शुक्राय नमः हा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. भावंडाशी वाद विवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याची प्रयत्न करावा. वरिष्ठांशी सलोखा मसलत राखावी. आज कालभैरवाष्टक म्हणणे.
आजचा रंग – तपकिरी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मीन आणि मेष राशीमध्ये आहे. स्थावर मालमत्तेशी जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाका, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ओम श्री नमः बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu