07 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १० जून २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

वृषभ:-नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

मिथुन:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. रेस, जुगार यांतून नुकसान संभवते. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

कर्क:-भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

सिंह:-लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

कन्या:-इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

तूळ:-स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

वृश्चिक:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

धनू:-इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

मकर:-चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

कुंभ:-मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हितशत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

मीन:-मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 12:52 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 10th june 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ९ जून २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ८ जून २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ७ जून २०२०
Just Now!
X