09 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-
    कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. गायन कलेला प्रोत्साहन मिळेल. गोड पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल.
  • वृषभ:-
    दिवस मनासारखा घालवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनातून गैरसमज दूर करावेत. पारंपरिक कामातून धनलाभ होईल.
  • मिथुन:-
    मानसिक शांतता राखली जाईल. इतरांना आनंदाने मदत कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. समाजप्रियता वाढीस लागेल. चुगल्या करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.
  • कर्क:-
    मुलांच्या स्वच्छंदी वागण्याची चिंता वाटेल. मैदानी खेळ खेळाल. अपचनाचा त्रास जाणवेल. तुमच्यातील चपळाई दाखवावी लागेल. कौशल्य पणाला लावून काम कराल.
  • सिंह:-
    कामाचा आनंद मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सुखासक्तपणा जाणवेल. आळस दूर सारून कामे करावीत. तुमच्या कार्यपद्धतीचा प्रभाव पडेल.
  • कन्या:-
    तांत्रिक ज्ञानावर भर द्यावा लागेल. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. लहरिपणाने वागू नये. डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल.
  • तूळ:-
    अडथळ्यातून मार्ग काढाल. कामाचा जोम वाढेल. उतावीळपणा करून चालणार नाही. महात्त्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. तुमचा रुबाब दिसून येईल.
  • वृश्चिक:-
    स्वभावात मानिपणा दाखवाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवून द्याल. सर्वांचे लक्ष वेधून घ्याल. काही वेळेला कणखरपणा दाखवावा लागेल. सामाजिक दर्जा सुधारेल.
  • धनु:-
    चारचौघात मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मानाजोगी खरेदी करता येईल. तुमची हौस भागवून घ्याल.
  • मकर:-
    हातात नवीन अधिकार दिले जातील. तुमचे अस्तित्व सिध्द करता येईल. मान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न कराल. कमिशन मधून कमाई होईल. आर्थिक दर्जा सुधारेल.
  • कुंभ:-
    सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्यावा. मनातील भावना उत्तम प्रकारे मांडाल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. बढतीसाठी प्रयत्न करा. तुमचा प्रभाव दिसून येईल.
  • मीन:-
    स्वभावातील मानीपणा दूर सारावा. महत्त्वकांक्षा वाढिस लागेल. हातात नवीन अधिकार येतील. तुमचा मान वाढेल. तुमच्या कलेची योग्य दखल घेतली जाईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 11 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ डिसेंबर २०१९
Just Now!
X