28 January 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कामात चंचलतेला मध्ये आणू नये. एकाग्रता वाढवावी लागेल. सामाजिक वजन वाढेल. काही कामे वेळ काढतील. वारंवार बदल करू नयेत.
 • वृषभ:-
  इतरांना सेवेचे महत्त्व पटवून द्याल. धार्मिक कामात हातभार लावाल. बौद्धिक चुणूक दाखवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.
 • मिथुन:-
  काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. चुकीच्या कामात अडकू नये. प्रामाणिकपणे कामे हाती घ्यावीत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक स्थैर जपावे.
 • कर्क:-
  एकमेकांतील ओढ वाढेल. वैवाहिक सौख्यात अधिक भर पडेल. प्रवास करावा लागेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक खर्च वाढेल.
 • सिंह:-
  सतत गप्पांमध्ये रमाल. कमिशनमध्ये फायदा संभवतो. बोलतांना भान राखावे. सर्वांशी गोड बोलण्यावर भर द्याल. काटकसर कराल.
 • कन्या:-
  तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चांगली छाप पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. हौस पूर्ण कराल. लोक तुमच्यावर खुश होतील. पत्नीचा सुस्वभाविपणा दिसून येईल.
 • तूळ:-
  मनात विचित्र कल्पना बाळगू नका. वेळ ठरवून गाठीभेटी ठरवाव्यात. मनात नसतांना प्रवास करावा लागेल. निष्ठा ढळू देवू नका. घरगुती कामात वेळ निघून जाईल.
 • वृश्चिक:-
  आपलाच हेका पूर्ण कराल. परिस्थितीवर मात कराल. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नये. साहसाने कामे हाती घ्याल. परिस्थिती आवाक्यात आणाल.
 • धनु:-
  प्रवासात सतर्कता बाळगावी लागेल. स्वकष्टाने कामे करण्यावर भर द्याल. सासुरवाडीच्या मंडळींचे सहकार्य घ्यावे. शक्तीची उपासना करावी. पराक्रमाला वाव मिळेल.
 • मकर:-
  तडकाफडकी काही गोष्टी कराव्या लागतील. उष्णतेचे विकार जाणवतील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. पोटाचे विकार जाणवू शकतात. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.
 • कुंभ:-
  काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. क्षुल्लक कारणावरून वाद घालू नयेत. भागादारीत मतभेदाला थारा देवू नये. विवाह विषयक गोष्टी काही काळासाठी पुढे ढकलावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.
 • मीन:-
  फार काळजी करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुगल्या करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. निंदा करणारे लोक त्रासदायक ठरू शकतात. कष्टाने कामे पार पडतील.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 11, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 11 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ सप्टेबर २०१९
Just Now!
X