05 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  • मेष:-आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकाऱ्यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
  • वृषभ:-जुगाराची हौस पूर्ण कराल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
  • मिथुन:-घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.
  • कर्क:-जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.
  • सिंह:-मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.
  • कन्या:-दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल.
  • तूळ:-आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
  • वृश्चिक:-संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.
  • धनू:-योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.
  • मकर:-सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
  • कुंभ:-आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.
  • मीन:-कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

        – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 11th march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ०९ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, ८ मार्च २०२०
Just Now!
X