मेष
गणपती मंदिरामध्ये हिरव्या वस्तू दान कराव्यात. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – नारंगी

वृषभ
गणपती अष्टकाने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
देवी कवच आणि गणपती स्तवन करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.

आजचा रंग – आकाशी

कर्क
गणपती उपासननेने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – पिवळा

सिंह
रामरक्षेचे पाठ करावेत. मारूती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – निळा

कन्या
गणपती उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
महादेवाची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्र”न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा

धनु
गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. शेअर आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – निळा

मकर
कुलस्वामिनीची ओटी भरावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जुणी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ
ओम द्रां द्रीं द्रौं स: आदि गुरवे नम: या मंत्राचा ११ वेळा पाठ करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग- पांढरा

मीन
गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.०३ नंतर कुंभ राशीत असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu