13 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १३ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. गायन कलेला चांगला वाव मिळेल. जोडीदाराविषयी चटकन मत बनवू नका.
 • वृषभ:-
  दिवस आनंदात जाईल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल.
 • मिथुन:-
  सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानसिक चंचलता जाणवेल. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक शांतता जपावी.
 • कर्क:-
  नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. कामातील उत्साह ढळू देऊ नका. काही कौटुंबिक अडचणी सोडवाल. मित्रांशी दुरावा वाढू शकतो. पोटाचे विकार जाणवतील.
 • सिंह:-
  हातातील अधिकार वापरावेत. कामाचे समाधान मिळेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. तुमच्यातील धाडस वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.
 • कन्या:-
  कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. फसवणुकीपासून सावध राहावे. कोणाचाही मत्सर करु नये. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्या. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
 • तूळ:-
  उष्णतेचा त्रास जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मानसिक चंचलता राहील. चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकू नका. आर्थिक व्यवहार जपून करावेत.
 • वृश्चिक:-
  जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. जवळचा प्रवास मजेत होईल. सामाजिक भान ठेवावे.
 • धनु:-
  जमिनीच्या व्यवहारातून फायदा संभवतो. कौटुंबिक समाधान लाभेल. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. नवीन मित्र जोडले जातील. कमाचा चांगला मोबदला मिळेल.
 • मकर:-
  आर्थिक स्थैर्य जपाल. मानसिक शांतता लाभेल. घरासाठी काही वस्तूंची खरेदी कराल. व्यापाऱ्यांना चांगला लाभ संभवतो. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
 • कुंभ:-
  कामातील किरकोळ अडचणी दूर कराव्यात. इतर गोष्टीत जास्त लक्ष घालू नये. स्थावरची कामे सुरळीत पार पडतील. कामाची चांगली प्रशस्ती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
 • मीन:-
  गुरुकृपेचा लाभ घ्यावा. दिवस ऐषारामात जाईल. कामाचे चीज होईल. वडिलधा-यांचा आशीर्वाद लाभेल. अधिकारी व्यक्तिंच्यात वावराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 13 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, १० नोव्हेंबर २०१९
Just Now!
X