मेष

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. गणपती मंदिरात हिरव्या वस्तू दान कराव्यात.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीमध्ये दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंवचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. गणपती अष्टकाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा

Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
1st March Panchang Marathi Horoscope Shani krupa On First Saturday On Mesh To meen Who Will Earn More In March 2024 Astrology
१ मार्च पंचांग: लक्ष्मी कृपेने महिन्याचा पहिला शुक्रवार मेष ते मीन राशीला कसा जाईल? लाभ कुणाला, भविष्य सांगते की..
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?
29 February Horoscope Marathi
२९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग: चार वर्षांतून एकदा येतो ‘हा’ खास दिवस! कसे असेल बारा राशींचे ग्रहमान, पाहा

मिथुन

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. देवी कवच आणि गणपती स्तवन करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – आकाशी

कर्क

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. संमिश्र लाभाचा दिवस. वादविवाद टाळावेत. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. गणपती उपासनेनी दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- पिवळा

सिंह

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास मिटवण्याकडे कल ठेवावा वरिष्ठांशी सलोखा राहील. रामरक्षेचे पठण करावे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, व्यावसायिक, विचारवंतांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. गणपती उपासना करावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. संमिश्र लाभाचा दिवस. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. वादविवाद टाळावेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचा योग आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तांबे, भुसार मालाचे व्यापारी, मिरचीशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम. गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

मकर

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. कुलस्वामिनीची ओटी भरावी. आजचा रंग – तपकिरी

कुंभ

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळनंतर वेळ आनंदात जाईल. ओम द्रां द्री स आदि गुरवे नमः या नामाचा ११ वेळा पाठ करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

मीन

सकाळी नव्वापासून तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको, गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu