12 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १५ जुलै २०२०

जाणून घ्या कोणत्या राशीला कसा जाणार दिवस

मेष:-जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.

वृषभ:-मनात आशेचा नवीन किरण उठेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका.

मिथुन:-आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.

कर्क:-आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. कामाची घाई-गडबड राहील. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.

सिंह:-अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आरोग्यात सुधारणा संभवते. मानसिक समाधान लाभेल. कालगुणांना वाव द्यावा.

कन्या:-तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. अति विचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थिती बाहेर पडावे लागेल.

तूळ:-क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.

वृश्चिक:-हातातील कामात मनाजोगे यश येईल. सहकारी तुम्हाला वेळेवर मदत करतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

धनू:-कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. आपला आनंद आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.

मकर:-साहसाने कामात हात घाला. प्रवास जपून करावा. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल.

कुंभ:-वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

मीन:-मानसिक उत्साह वाढेल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. अधिक जोमाने कामे कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:37 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 15th july 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १४ जुलै २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, १३ जुलै २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, १२ जुलै २०२०
Just Now!
X