मेष
कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
कालभैरव अष्टक पाठ सकाळी आणि संध्याकाळी करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
ओम हरेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – लाल

सिंह
ओम हरेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
ओम हरेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – हिरवा

तुळ
गणपती व मारूतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – फिकट पिवळा

वृश्चिक
गणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमेवत आनंदी वेळ घालवू शकाल प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – नारंगी

धनु
ओम केशवाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – पांढरा

मकर
गणपती मंदिरात दानधर्म करावा. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
गुरूलीलामृतचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणी मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थित उत्तम राहील.
आजचा रंग- निळा

मीन
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृषभ राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu