News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष : आपल्या नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.आजचा दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. आपले ध्येय पूर्ण करण्याच्यादृष्टीने संयमाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. घाईगडबडीने कोणतेही काम करु नये.

वृषभ : आपल्या नोकरी व्यवसायातील ताण घरापर्यंत आणू नका. भावडांशी मतभेद् टाळावेत. अचानक धनलाभाची शक्यताआहे. सरकारी वास्तू व वाहनाचे योग येतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकीक वाढेल.

मिथुन : भागिदारी व्यवसायात दुसर्यावर विसंबून राहून कोणतेही महत्वाचे तुम्हाला न पटणारे निर्णय घेऊ नका. कुटुंबातीलव्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून चांगले लाभ घडून येतील.

कर्क : भागिदाराबरोबर व्यावसायिक मतभेद होतील. आज आपल्या तब्येतीच्या तक्रारी राहतील महत्वाचे आर्थिक व्यवहार पुढेढकलावेत. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य  काळ आहे. धाडसी निर्णय घेतले जातील.

सिंह : आपले मनोबल खचणारी एखादी घटना घडेल. पण त्यावर आपण आपले मत प्रकट करू नये. आपल्या घरी संतसज्जनांचा सहवास लाभेल. आर्थिक बाबतीत चिंतेचे कारण गनसले तरी आज खर्चावर नियंत्रण हवेच.  आश्वासने देण्याचे शक्यतो टाळावेत.

कन्या : आज आपल्याला आपल्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. आपले निर्णय योग्य ठरतील. आज आपण प्रवासयोगटाळावेत. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल.

तूळ : अपेक्षित गाठीभेटी होतील. व्यावसायिक करारमदार करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपली मते इतरांनापटवून देण्यात यशस्वी व्हाल. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल.

वृश्चिक : आपण ठरविलेली आजची कामे आजच पूर्ण करा. त्यात दिरंगाई करू नका. व्यवसायानिमित्त पूर्वी ठरविलेल्या अपेक्षित गाठीभेटी पार पडतील व त्यातून आपले ध्येय साध्य होईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.

धनू : आज आपली कामे विनासायस पूर्ण होतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसाय उदयोगातील आर्थिक उलाढालीआज टाळाव्यात. पूर्वीच्या मिळालेल्या कामतील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकार कक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल.

मकर : संततीच्या उत्कर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या तब्येतीच्या तक्रारी राहतील; ताबडतोब औषधोपचार करा. वाहने चालविताना सावधगिरी बाळगा. नोकरी व्यवसायात स्थिरता लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्यकर्म घडेल.

कुंभ : नोकरीतील आर्थिक आवक वाढेल. आज आपल्याला गुंतवणूकीचे योग येतील. शांतवृत्तीने निर्णय घेतलेत तर सर्व कामेयोग्य रीतीने पार पडतील. मोठय़ा प्रमाणावर व्यवसायातील आर्थिक उलाढाली करताना नवीन उपक्रमांची अंमलबजावणी मात्र तूर्त पुढे ढकलावी.

मीन : भावंडसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला विशेष अनुकूल आहे. आजचा दिवस आपल्याला नोकरीतीलकामानिमित्त परदेशप्रवासास जाण्यास अनुकूल आहे. आजचा दिवस विशेष भाग्यकारक घटनांचा आहे. प्रियव्यक्तीच्या सहाय्याने व्यवसायात भरभराट घडवून आणेल. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 16 december 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ डिसेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ डिसेंबर २०२०
Just Now!
X