• मेष:-
    दिवस प्रसन्नतेत उगवेल. गोष्टी मनासारख्या घडतांना दिसून येतील. आरोग्यात सुधारणा होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. भागीदारीत चांगला फायदा संभवतो.
  • वृषभ:-
    नसती भांडणे उकरून काढू नयेत. थापा मारू नयेत. इतरांचा विश्वास संभवतो. भांडणे विकोपाला जावू देवू नयेत. फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे.
  • मिथुन:-
    तुमची बौद्धिक बाजू दाखवून द्याल. घरगुती प्रसंग घरातच मिटवावेत. वाहन विषयक कामात खास लक्ष घालावे. मनातील अपेक्षांना अधिक महत्त्व द्याल. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ संभवतो.
  • कर्क:-
    पराक्रमाला चांगला वाव आहे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद वाढवू नका. तुमच्यातील कलागुणांना वाव द्यावा. नोकरदार स्त्रियांना प्रगती करता येईल.
  • सिंह:-
    आवक-जावक यांचे नीट गणित मांडावे. रागावर नियंत्रण ठेवावे. अनाठायी खर्च करू नका. गायन कलेला प्रसिद्धी मिळेल. नि:स्वार्थीपणे इतरांना मदत कराल.
  • कन्या:-
    दृढनिश्चय करावा लागेल. झेपेल एवढेच काम हाती घ्यावे. मनाजोगी खरेदी करता येईल. चांगला आर्थिक लाभ होईल. कामाची धावपळ थोडी कमी होईल.
  • तूळ:-
    मनाच्या चंचलतेवर उपाय शोधावा लागेल. चुकीच्या लोकांच्यात सामील होवू नका. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस आळशीपणात घालवाल.
  • वृश्चिक:-
    घरगुती कार्यक्रमात सहभाग घ्याल. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे पार पडतील. खोट्या गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. जुनी कामे निघतील.
  • धनु:-
    नवीन मित्र जोडले जातील. कामाचा चांगला मोबदला मिळेल. मानसिक समाधान लाभेल. पत्नीची उत्तम साथ लाभेल. घरासाठी ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल.
  • मकर:-
    नसत्या भानगडीत पडू नका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. प्रवासात वाहन चालवितांना काळजी घ्यावी.
  • कुंभ:-
    थंड पदार्थांचे सेवन करावे. किरकोळ जखमांवर वेळीच उपाययोजना करावी. हातापायाची काळजी घ्यावी. शारीरिक कष्ट वाढू शकतात. अपचनाचा त्रास जाणवू शकतो.
  • मीन:-
    मुलांच्या खोड्या वाढू शकतात. जोडीदाराशी अनबन होवू शकते. गैरसमजाला मनात थारा देवू नका. भागीदारीत सामोपचार ठेवावा. जनक्षोभाला बळी पडू नका.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर