24 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.

वृषभ:-येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

मिथुन:-मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.

कर्क:-कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

सिंह:-मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.

कन्या:-घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.

तूळ:-व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

वृश्चिक:-आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

धनू:-घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.

मकर:-जोडीदारामुळे भाग्योदय होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.

कुंभ:-स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.

मीन:-प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:25 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 16 september 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, १४ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, १३ सप्टेंबर २०२०
Just Now!
X