1. मेष:-
    प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल.
  2. वृषभ:-
    मनाने कामे मिळवाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे.
  3. मिथुन:-
    सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी.
  4. कर्क:-
    नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल.
  5. सिंह:-
    मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे. ओळखीचा फायदा होईल.
  6. कन्या:-
    अतिअपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा. समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. जोडीदाराचा निश्चय मान्य करावा लागेल. वैचारिक दिशा बदलून पहावी.
  7. तूळ:-
    जवळच्या प्रवासात त्रास संभवतो. क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका. कामाचा उरक वाढेल. हातातील अधिकार वापरावेत. मनोभंगाला सामोरे जावे लागू शकते.
  8. वृश्चिक:-
    हातातील कामात यश येईल. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेला चांगले बळ मिळेल. कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा.
  9. धनू:-
    प्रवासात रुखरुख लागून राहील. मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा. गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. नातेवाईकांचा विरोध होवू शकतो.
  10. मकर:-
    वायफळ खर्च वाढेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कोणाच्याही मदतीशिवाय कामे पार पाडाल. योग्य तारतम्य बुद्धी वापरावी. प्रांजळपणे वागणे ठेवाल.
  11. कुंभ:-
    उदारपणे वागणे ठेवाल. बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल. बढतीची चिन्हे दिसून येतील. घशाचे विकार होण्याची शक्यता आहे.
  12. मीन:-
    स्वत:चा सत्वगुण राखाल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर