29 November 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २० मे २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.

वृषभ:-मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन:-स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क:-घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.

सिंह:-इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे.

कन्या:-अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

तूळ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.

वृश्चिक:-कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

धनू:-आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.

मकर:-संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा बदलून पहावी.

कुंभ:-नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.

मीन:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 20th may 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १९ मे २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, १८ मे २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, १७ मे २०२०
Just Now!
X