1. मेष:-
    धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व जाणून वागाल. परदेशगमनाचा योग येईल. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची गाठ पडेल. सामाजिक सेवेत काम कराल.
  2. वृषभ:-
    जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. जुन्या कामातून लाभ संभवतो. वारसा हक्काच्या कामात लक्ष घालावे लागेल. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.
  3. मिथुन:-
    उत्कृष्ट वैवाहिक सौख्य लाभेल. उगाचच मतभिन्नता दाखवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकाराचा त्रास जाणवेल. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत.
  4. कर्क:-
    मानसिक शांतता जपावी. क्षुल्लक कटकटी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कफ विकार जाणवतील. तुमची चिडचिड वाढू शकते.
  5. सिंह:-
    शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. अंत:स्फूर्तीने कामे कराल. सूचक स्वप्ने पडतील. जुगाराची आवड दाखवाल. काहीसे स्वछंदीपणे वागाल.
  6. कन्या:-
    उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात थोर व्यक्तींची ऊठबस राहील. भावंडांची बाजू जाणून घ्या. चांगले वाहन सौख्य लाभेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.
  7. तूळ:-
    मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मानसिक संवेदना दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागणे ठेवाल. नवीन गोष्टी जाणून घ्याल.
  8. वृश्चिक:-
    कौटुंबिक कार्यक्रम आखले जातील. अडथळ्यातून मार्ग काढाल. मेहनतीला मागे हटू नका. कामात उतावीळपणा करू नका. हट्टीपणे वागणे राहील.
  9. धनू:-
    आपल्या मनाप्रमाणे वागाल. वैचारिक प्रौढता दाखवाल. सामाजिक जाणि‍वेतून कामे कराल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. गैरसमजुतीला बाजूला ठेवा.
  10. मकर:-
    कामात क्षुल्लक कारणाने दिरंगाई होईल. पारमार्थिक उन्नती साधता येईल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. बौद्धिक दिमाख दाखवाल. कामात चलाखी दाखवाल.
  11. कुंभ:-
    सुसंस्कृत लोकांच्यात वावराल. सांपत्तीक अपेक्षा पूर्ण होतील. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील.
  12. मीन:-
    कामाची धांदल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. प्रवासात सावधानता बाळगावी. तुमचा मान वाढेल.
    या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 22 january 2020 aau
First published on: 22-01-2020 at 01:00 IST