मेष

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. गुरू लीलामृताचे पाठ करावेत. आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. गणपती मंदिरामध्ये दानधर्म करणे.
आजचा रंग- तपकिरी.

कर्क

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. ओम केशवाय नमः जप करावा.
आजचा रंग – निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. गणपती आणि मारुतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. ओम हरये नमः या मंत्राचा जप करणे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग – गुलाबी

धनु

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ओम हरये नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. कालभैरव अष्टक पाठ सकाळी आणि संध्याकाळी करणे.
आजचा रंग – जांभळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण धनु आणि मकर राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करू शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम. कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण करणे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu