05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २३ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-घरातील खेळकर वातावरणात रमाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. तुमच्यातील कलेला प्रसिद्धी मिळेल. प्रवासात योग्यती काळजी घ्यावी. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो.
 • वृषभ:-
  जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. तुमच्यावर कौतुकाची थाप पडेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. आवडता छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल.
 • मिथुन:-
  कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. आवडीवर ठाम राहाल. मनाची उथळता दूर करावी. जोडीदाराचे विचार प्रौढ जाणवतील. नातेवाईकांची सलोखा वाढवावा.
 • कर्क:-
  विचारांना चुकीची दिशा देवू नका. आपल्याच मतावर ठाम राहाल. कामातील घाई उपयोगाची नाही. स्वत:ची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. दिवस मनाप्रमाणे घालवाल.
 • सिंह:-
  वैचारिक व्यग्रता जाणवेल. काही गोष्टी इतरांसाठी कराल. चोरांपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवाल.
 • कन्या:-
  लहान-सहान दुखणी त्रासदायक ठरतील. गप्पांमधून वादास तोंड फुटणार नाही याची काळजी घ्या. घरगुती जबाबदारी येईल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील.
 • तूळ:-
  वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. अंगिभूत कलागुणांना प्रसिद्धी मिळेल. बोलण्यात गोडवा ठेवाल. कामातील दिरंगाई दूर करावी.
 • वृश्चिक:-
  उगाचच निराशा जाणवू शकते. तुमच्यातील मुळच्या चिकाटीला सोडू नका. सरकारी कामांना खीळ बसू शकते. खर्चावर लक्ष ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सतर्कता ठेवावी.
 • धनु:-
  मोठ्या लोकांची ओळख वाढेल. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल. नवीन मित्र, मैत्रिणी जोडाल. मानसिक सौख्य लाभेल. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.
 • मकर:-
  मनातील आकांक्षांची पूर्ती होईल. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. ओळखीचा चांगला उपयोग होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
 • कुंभ:-
  कामाचा आनंद मिळेल. हाताखालील नोकरवर्ग तुमची चांगली साथ देईल. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
 • मीन:-
  कौटुंबिक करमणुकीचे कार्यक्रम आखाल. सखोल चिंतन-मनन कराल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. उत्तम विचार मांडाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 23 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २० ऑक्टोबर २०१९
Just Now!
X