• मेष:-
    मानसिक थकवा जाणवू शकतो. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होण्याचे कारण नाही. घरातील वडील व्यक्तींचा तुम्हाला विरोध होऊ शकतो. आपली बाजू योग्यप्रकारे मांडावी. प्रवास करावा लागेल.
  • वृषभ:-
    हातातील कामात यश येईल. तुमचा दर्जा वाढेल. विरोधातील व्यक्ती शांत राहतील. छुप्या शत्रूंवर विजय मिळविता येईल. कामातून चांगली धनप्राप्ती होईल.
  • मिथुन:-
    मुलांशी मतभेद संभवतात. कामाचा ताण वाढू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येईल. चोरांपासून सावध राहावे. छुपेशत्रू त्रासदायक ठरू शकतात.
  • कर्क:-
    नातेवाईकांचे प्रश्न त्रासदायक ठरतील. मनातील निरुत्साह काढून टाकावा. कौटुंबिक अडचण सोडवाल. मित्रांशी सुयोग्य संवाद साधावा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील.
  • सिंह:-
    हातात नवीन अधिकार येतील. तुमचा दर्जा सुधारेल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुमचे धैर्य वाढीस लागेल. प्रवासात काळजी घ्यावी.
  • कन्या:-
    फसवणुकीपासून सावधानता बाळगावी. खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मत्सराला बळी पडू नका. सहकाऱ्यांशी सामोपचाराने वागावे. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.
  • तूळ:-
    रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. कोणाशीही उघड शत्रुत्व पत्करू नका. किरकोळ जखमांवर वेळीच उपाय करावा. अडचणींवर मात करावी.
  • वृश्चिक:-
    पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेरील असतील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. गुप्तशत्रूंवर विजय मिळवाल.
  • धनु:-
    घेतलेल्या कामाचे योग्य फळ मिळेल. मित्रमंडळींशी असणारे संबंध जपावेत. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. चंचलतेवर मात करावी.
  • मकर:-
    अचानक सामोरी येणारी प्रकरणे सोडवावी लागतील. तुमचा विरोध केला जाऊ शकतो. सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कामातील विलंब टाकण्याचा प्रयत्न करा. सर्वांना आनंदी ठेण्याचा प्रयत्न कराल.
  • कुंभ:-
    कामात चलबीचलता आणू नका. कौटुंबिक सौख्याचा विचार प्रथम करावा. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. मानसिक पिछेहाट टाळावी. सामाजिक संबंध सुधारतील.
  • मीन:-
    वादाचे प्रसंग टाळा. दिरंगाईतून योग्य मार्ग काढाल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. परोपकाराची जाणीव ठेवावी. पत्नीच्या सहवासात रमाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर