27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २५ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  घराची स्वच्छता काढाल. घरातील कामात अडकून पडाल. ज्येष्ठांचा प्रेमळ सहवास लाभेल. सुगंधी वस्तू खरेदी कराल. जवळचे मित्र भेटतील.
 • वृषभ:-
  जवळचा प्रवास सुखाचा होईल. भावंडांच्या सहवासाचा लाभ होईल. एकलकोंडेपणा दूर कराल. जुन्या गोष्टी वेळेवर आठवतील. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल.
 • मिथुन:-
  घरगुती कामे आवडीने कराल. बुद्धीवादी दृष्टीकोन ठेवाल. महिलावर्ग अलंकार खरेदी करतील. बैठे खेळ खेळाल. इतरांचे योग्य मूल्यमापन कराल.
 • कर्क:-
  तुमची प्रेमळ छाप पडेल. दिवस मजेत जाईल. सर्वांशी आंनदाने वागाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. चोरांपासून सावध राहावे.
 • सिंह:-
  स्त्रीवर्गाचा पडगा राहील. काही कामात जास्त कष्ट पडतील. गोड बोलून उद्धिष्ट साध्य कराल. जबाबदारीने कामे पार पाडाल. अपेक्षाभंग पदरी पडू शकतो.
 • कन्या:-
  रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. कामे वाढल्याने थकवा जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्यावी. काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. मनाची चंचलता जाणवेल.
 • तूळ:-
  खर्च वाढू शकतो. नसत्या चिंता मागे लागतील. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सुखप्राप्ती होईल.
 • वृश्चिक:-
  सामाजिक ठिकाणी प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल. व्यवसायातील वाढीचा विचार कराल. लहानांन मध्ये रमाल. मित्र परिवारात वाढ होईल.
 • धनु:-
  मनातील आकांक्षांना मूर्त रूप द्याल. मोठ्या व्यक्तींच्या ओळखीचा फायदा होईल. अंगीभूत कलेला चांगला वाव मिळेल. व्यावसायिक लाभ चांगला होईल. मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल.
 • मकर:-
  प्रेमसौख्यात वाढ होईल. आपापसातील जिव्हाळा वाढेल. समजुतदारपणाने सर्वांना आपलेसे कराल. शिस्तीने वागण्यावर भर द्याल. तरल बुद्धीचा वापर करावा.
 • कुंभ:-
  परिस्थितीला नावे ठेवू नका. क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देवू नका. आत्मविश्वास बाळगावा लागेल. किरकोळ कटकटीतून मार्ग काढावा. मानसिक स्वास्थ्य जपावे.
 • मीन:-
  जोडीदाराचा सुस्वभाविपणा दिसून येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराला आर्थिक फायदा संभवतो. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. उच्च राहणीची आवड जोपासाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 25 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २२ सप्टेंबर २०१९
Just Now!
X