मेष

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. ओम श्री भानवे नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. भावंडांच्या भेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. आज कालभैरव अष्टक म्हणावे.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. ओम बुधाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. दगदगीचे दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेऊन दिवसाचा आरंभ करावा.
आजचा रंग – नारंगी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत. गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. उत्तम व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. ओम श्री भानवे नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पोपटी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कुटुंबासमवेत वेळ आनंदात घालवू शकाल. संततीसौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे. आजचा रंग – नारंगी

मकर

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न मार्गील लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कालीमातेचे दर्शन घ्यावे. आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल.
आजचा रंग – नारंगी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu