28 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ फेब्रुवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    मानसिक चंचलता जाणवेल. कर्जप्रकरणे सध्या टाळावीत. जोडीदाराशी हितगुज करता येईल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.
    वृषभ:-
    स्त्री समूहात अधिक वावराल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. दिवस काहीसा आळसात जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.
  2. मिथुन:-
    कलेचे योग्य मानधन मिळेल. सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वेळ व काम यांचे गणित जुळवावे लागेल.
  3. कर्क:-
    धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. पित्त विकार बळावू शकतात, गैरसमजाला खतपाणी घालू नका. भावंडांना मदत करावी लागेल. खाण्या पिण्याचे पथ्य पाळा.
  4. सिंह:-
    अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील. मुलांची धडाडी वाढेल. पैज जिंकता येईल.
  5. कन्या:-
    वैवाहिक सौख्यात भर पडेल. जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. घरात काही बदल कराल.
  6. तूळ:-
    क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करू नका. मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा.
  7. वृश्चिक:-
    स्व‍च्छंदीपणे वागाल. जुगारातून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल. स्व-मतावर ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.
  8. धनु:-
    घराचे सुशोभीकरण काढाल. प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरात सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. मानसिक शांतता लाभेल.
  9. मकर:-
    अघळपघळपणे बोलणे टाळा. संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल. हातून एखादे सत्कार्य घडेल. कौटुंबिक खर्चाकडे लक्ष ठेवा.
  10. कुंभ:-
    बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
  11. मीन:-
    मनाजोगा दिवस घालवाल. लाघवीपणे सर्वांना आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. सौंदर्य वादी नजर बाळगाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 26 february 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २४ फेब्रुवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २३ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X