25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, २८ ऑगस्ट २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  कौटुंबिक कामात गढून जाल. मैत्री अधिक दृढ होईल. घरगुती वातावरणात रमाल. अचानक लाभाची शक्यता. मित्रांच्या संगतीत रमाल.
 • वृषभ:-
  कामाला योग्य गती मिळेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब सहलीची मजा घ्याल. आवडते पुस्तक वाचाल.
 • मिथुन:-
  गोड बोलण्यावर भर द्याल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. गोड पदार्थ चाखायला मिळतील. तुमच्या कौतुकात भर पडेल. विरोधकांवर लक्ष ठेवा.
 • कर्क:-
  उत्तम मानसिक स्वास्थ लाभेल. नवीन गुंतवणूक कराल. गायन कलेत प्रगती होईल. सर्वांशी आपुलकीने जवळीक साधाल. आवडीच्या कामात गुंग व्हाल.
 • सिंह:-
  आलेली संधी दवडू नका. दिवस चैनीत घालवाल. उत्साहाने कामे हाती घ्याल. संयम व सारासार विचार यांवर अधिक भर द्यावा. भडक शब्द टाळावेत.
 • कन्या:-
  व्यावसायिक स्तर उंचावेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. वायफळ खर्च टाळावा. कामाच्या पद्धतीत योग्य तो बदल करावा. वैवाहिक सौख्यात रमून जाल.
 • तुळ:-
  स्त्री समुहात वावराल. मैत्रीचे संबंध जपावेत. व्यावसायिक मान वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुरूप गोष्टी घडतील. कामाचे कौतुक केले जाईल.
 • वृश्चिक:-
  कामातील बदल लक्षात घ्यावा. निष्ठा ढळू देवू नका. व्यावसायिक संबंध जपावेत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस मजेत घालवाल.
 • धनु:-
  क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. फार चिंता करु नये. कमी कष्टात लाभ संभवतो. अचानक धनलाभाची शक्यता. कफ विकार जाणवतील.
 • मकर:-
  कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. गैरसमजापासून दूर राहावे. हातातील कामात यश येईल. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात अधिक भर पडेल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल.
 • कुंभ:-
  गृह्सौख्याकडे लक्ष द्यावे. परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. कफविकार जाणवतील. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. अधिकार वाणीने बोलाल.
 • मीन:-
  आपले मत इतरांना पटवून द्यावे. भांडणात अडकू नका. मुलांच्या आनंदात रममाण व्हाल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाचा आनंद घ्याल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on August 28, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi wednesday 28 august 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २७ ऑगस्ट २०१९
2 आजचे राशीभविष्य, सोमवार, २६ ऑगस्ट २०१९
3 आजचे राशीभविष्य, रविवार, २५ ऑगस्ट २०१९
Just Now!
X